आमच्या सेवा

सांध्यात किंवा आजूबाजूला दुखले कि, व्यवहारात त्याला संधिवात म्हणतात. यातच मानेचे, पाठीचे व कंबरेचे दुखणेही येते. सांधे हा मूळचा संस्कृत शब्द आहे. सांधे म्हणजे सांधा. वात हाही संस्कृत शब्द. संधिवाताला इंग्रजीत ‘ऱ्हुमॅटिझम’ म्हणतात. ऱ्हुम या ग्रीक शब्दाचा अर्थ प्रवाही किंवा वाहणारा (स्रवणे, पाझरणे). सूज येते ती द्रवामुळे पण बोली भाषेत सुजेमुळे किंवा सूज नसतानाही…

सूज असणाऱ्या आमवतांपैकी र्हेउमटोइड आमवात सर्वात महत्त्वाचा. स्त्रियांमध्ये या या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा ५ ते १० पटींनी जास्त आहे. त्यात काहीशी अनुवांशिकताही आहे. तरुण वयात आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या आजाराकडे फार गांभीर्याने पाहिले पाहिजे. या आमवाताच्या सुजेमुळे सांध्याच्या आतली कुर्चा आणि हाडे कुर्तडली जाऊन त्याचा नाश होतो. आपल्या शरीरात कूर्चेचे पुनरुज्जीवन होऊ शकत नसल्यामुळे एकदा वाकडा झालेला सांधा पुन्हा सरळ होऊ शकत नाही…

आपल्या शरीरात अनेकविध पेशी नाश पावत असतात आणि त्याजागी नव्या तयार होत असतात . अशा जीर्ण पेशींची विल्हेवाट लावताना त्यापासून युरिक ऍसिड बनते . युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाले म्हणजे त्यांचे सांध्यांमध्ये स्फटिक बनतात. अशा स्फटिकांमुळे सांध्याला अचानक सूज येते व विंचू चावल्यासारख्या वेदना होतात . स्फटिकांमुळे सांधा सुजणे म्हणजे गाऊट. फक्त युरिक ऍसिड वाढणे म्हणजे गाऊट नव्हे.

अएन्कस्पॉन म्हणजे कंबरेचा आमवात . हा एक प्रतिकारशक्तीचाच आजार . त्याचे नेमके कारण माहित नाही . तो माकड हाडाच्या सांध्यापासून (सॅक्रोइलियाक सांधा प्रकरण २) सुरु होतो . प्रदीर्घकाळ हळूहळू वाढत जातो. ऍन्किलोसिंग म्हणजे मानके एकमेकांना चिकटणे आणि स्पॉन्डीलाटिस (दोन्ही ग्रीक शब्द ) म्हणजे मणक्यांना सूज येणे. मणक्यांचे टेंडॉन्स (कंदरा) आणि लिगामेंटस जिथे मणक्यांना जोडलेले असतात तिथे सूज येणे हे याचे वैशिष्ट्य.

विषाणूंमुळे सांध्याच्या आतल्या आवरणाला ( सायनोव्हियम ) सूज येऊन चिकनगुनिया होतो. नाकात व्हायरसमुळे सर्दी-पडसे होते . तसे १९५३ मध्ये टांझानिया आणि मोझाम्बिक देशांच्या सीमेवरील माकोडे पठारावर हा आजार प्रथम सापडला. माकोडे भाषेतल्या कनगुन्याला या क्रियापदावरून हा शब्द तयार झाला . चिकनगुनिया म्हणजे रुग्णाला वाकवून टाकणारा आजार.

डॉ. निलेश पाटील

आपले चांगले आरोग्य आमचे सर्वात मोठे यश आहे.


पुणे शहरातील संधिवात उपचारांसाठी प्रचलित नाव म्हणजे डॉ. निलेश पाटील. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठित संस्थांमध्ये अभ्यास केला आहे. रूग्णांना उत्तम सेवा देण्याचा, डॉक्टर प्रत्येक टप्प्यावर एक जागरुक प्रयत्न करतात. डॉ.निलेश पाटील यांनी एफसीपीएस (अंतर्गत औषध),मुंबई आणि पीजी संधिवातशास्त्र मध्ये,झोन हॉपकिन्स विद्यापीठ, न्यूयॉर्क मधून प्राप्त केली आहे. आमच्या लोकांच्या ऱ्हुमॅटिक स्थितीविषयी जागरुकता पसरवणे आणि रुग्णांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आधुनिक उपचार उपलब्ध करणे हा त्याचा हेतू आहे.

डॉ. निलेश जयवंत पाटील
– संधिवात तज्ञ
– एफसीपीएस (अंतर्गत औषध),मुंबई
– पीजी संधिवातशास्त्र मध्ये,झोन हॉपकिन्स विद्यापीठ, न्यूयॉर्क
– युलियर फेलोओ

0
+
आनंदी रुग्ण
0
+
वर्षांचा अनुभव
0
+
यशस्वी केसेस
0
%
सकारात्मक प्रतिक्रिया

प्रशंसापत्र


सर्वोत्कृष्ट संधिवात तज्ञ मी भेटलो आहे .. उपचारांच्या सोबत त्यांनी रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढविला आहे आणि रुग्णाला आधीपेक्षा बरे वाटत आहे ..

पी. शर्मा रुग्ण

उत्तम डॉक्टर

निदान आणि उपचारांमध्ये डॉक्टर खूप चांगले आहे ….

भूपेंद्र पाटील रुग्ण

व्हिडिओ

आमवात