कडक कंबरेचे दुखणे (ankylosing spondylitis)

अएन्कस्पॉन म्हणजे कंबरेचा आमवात . हा एक प्रतिकारशक्तीचाच आजार . त्याचे नेमके कारण माहित नाही . तो माकड हाडाच्या सांध्यापासून (सॅक्रोइलियाक सांधा प्रकरण २) सुरु होतो . प्रदीर्घकाळ हळूहळू वाढत जातो. ऍन्किलोसिंग म्हणजे मानके एकमेकांना चिकटणे आणि स्पॉन्डीलाटिस (दोन्ही ग्रीक शब्द ) म्हणजे मणक्यांना सूज येणे. मणक्यांचे टेंडॉन्स (कंदरा) आणि लिगामेंटस जिथे मणक्यांना जोडलेले असतात तिथे सूज येणे हे याचे वैशिष्ट्य.

कारणे आणि प्रकार

नेमके कारण माहित नसले तरी HLAB27 नावाचे अनुवांशिक तत्त्व याच्या ९०% रुग्णांमध्ये असते. जवळच्या नातेवाईकाला असेल तर एखाद्याला होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा तिपटीने जास्त.

लक्षणे

१) काळात-नकळत सुरु होणारे ३ महिन्यांपेक्षा जास्त काळाचे दुखणे.
२) सकाळी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जकडकपणा .
३) व्यायामाने बरे वाटणे. विश्रांतीने नाही.
४) कंबरेच्या दुखण्याने उत्तर-रात्री जग येणे.
५) उजव्या-डाव्या नितंबाच्या आलटून पालटून दुखणे.
६) वय १० ते ४५

उपचार

ऍन्कस्पॉन पूर्णपणे बरा होत नाही पण नियंत्रणात मात्र ठेवता येतो . व्यायाम, व्यायाम आणि व्यायाम हाच त्याचा उपचार. दररोज अर्धा तास व्यायाम हा आयुष्याचा एक अपरिहार्य घटक झाला पाहिजे. अर्धा तास व्यायाम केला तर वेदना आणि कडकपणा कमी होतात . पोहणे हा सगळ्यात चांगला व्यायाम. सूज कमी करणारी वेदनाशामक औषधे कमीत-कमी मात्रेत नियमितपणे घ्यावीत. सारी वेदनाशामके सारखीच. या औषधांनी वेदना कमी होऊन व्यायाम करता येतो. झोप लागते. सूज कमी होऊन आजार बळावत नाही. नियंत्रणात राहतो. दुखणे थोडेसेच असेल तर पॅरासिटोमोल हि चालते.
सुमारे ९०% रुग्णांचा ऍन्कस्पॉन जास्त तीव्र असतो. ज्यांचा निर्देशांक ३.५ त्या ४.० पेक्षा जास्त असतो. त्यांच्यासाठी नवी जैविक औषधे (इटानरसेप्ट इंफिलॅक्सिमब ड़ाल्यूमुम्याब) वापरली पाहिजेत. दोन वेगवेगळी वेदनाशामके वापरून तीन महिन्यांत गुण दिसला नाही. तर या औषधांचा वापर करावा. असे आणखी एक मार्गदर्शक तत्त्व . या या औषधांचा मुख्य उपद्रव म्हणजे जंतुसंसर्गाची शक्यता. त्यामुळे औषध देताना जागरूक राहिले पाहिजे. हि औषधे फक्त ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट तज्ञांनीच वापरली पाहिजेत.