गाऊट आणि युरिक ऍसिड

आपल्या शरीरात अनेकविध पेशी नाश पावत असतात आणि त्याजागी नव्या तयार होत असतात . अशा जीर्ण पेशींची विल्हेवाट लावताना त्यापासून युरिक ऍसिड बनते . युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाले म्हणजे त्यांचे सांध्यांमध्ये स्फटिक बनतात. अशा स्फटिकांमुळे सांध्याला अचानक सूज येते व विंचू चावल्यासारख्या वेदना होतात . स्फटिकांमुळे सांधा सुजणे म्हणजे गाऊट. फक्त युरिक ऍसिड वाढणे म्हणजे गाऊट नव्हे.

कारणे

वाढणारे आयुर्मान, बदलती जीवनशैली व आहाराच्या सवयी हीच याची कारणे आहेत. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हे संप्रेरक लघवीवाटे युरिक ऍसिड बाहेर टाकते. पाळी गेल्यानंतर इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे युरिक ऍसिड वाढून गाऊटचे अटॅक येऊ शकतात. आहारातले काही पदार्थ युरिक ऍसिड वाढवतात . यांत मांस व मासे, बिअर व दारू (रोज २ पेक्षा जास्त पेग) तसेच गोड शीतपेय हे महत्त्वाचे . हृदयविकारात ऍस्पिरिन व लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे ,
क्षयरोगाचे इथॅमबूटॉल , पायरीझिनामोईड हि औषधे तसेच कॅन्सरवरील औषधांनी युरिक ऍसिड वाढते.

लक्षणे

पायाच्या अंगठ्याचा सांधा विशेषतः थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी अचानक दुखू लागतो. अत्यंत तीव्र वेदना होतात. काही तासांतच सांधा सुजतो लाल व गरम होतो. याला गाउटचा अटॅक म्हणतात. यांपैकी सुमारें २/३ जणांना वर्षभरात पुन्हा अटॅक येतो. काही लोकांना ४-६ आठवडयांनी वारंवार अटॅक येतात. रुग्णांमध्ये गुडघा, घोटा, मनगट किंवा कोपर सुजू शकते. एकापेक्षा जास्त सांधे सुजू शकतात. वारंवार येणाऱ्या अटॅक दरम्यान हे स्फटिक सांध्यातच राहतात. व सांध्यातली कुर्चा,तसेच अन्य भाग करीत राहतात. युरिक ऍसिडमुळे मूत्रपिंडांनाही इजा होऊ शकते. तसेच स्फटिकांचे मुतखडे बनून त्यांचाही त्रास होऊ शकतो. \

निदान

सामन्यात: गवताचा अटॅक सहज ओळखता येतो. शरीरातील युरिक ऍसिड अशा प्रकारे सांध्यात गेल्यामूळे रक्तात ते वाढलेले असेलच असे नाही. अशा प्रत्येक सुजलेल्या सांध्यातून पाणी काढून त्यातील स्फटिक विशेष पद्धतीने सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणे, हाच गाउटच्या निदानाचा सर्वोत्तम मार्ग. थोडेसे युरिक ऍसिड वाढले आणि कोठेतरी दुखत असले कि बरेचसे डॉक्टर गवताचे निदान करतात . हे योग्य नाही. गावच्या निदानासाठी तसेच उपचारांसाठी ऱ्हुमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेतलाच पाहिजे.

उपचार

गाऊट पूर्णपणे बारा होत आंही. तो कायम औषध घेऊन नियंत्रणात ठेवावा लागतो.. गाउटमुळे अचानक सांधा सुजतो.तेव्हा कोलविसीन किंवा सूज कमी करणारी वेदनाशामक औषधे वापरतात. हल्ली यासाठी स्टिरॉईड्सही वापरतात.गाऊटमध्ये युरिक ऍसिड ६ मी ग्राम पेक्षा कमी झाले तरीही दर ६ महिन्यांनी युरिक ऍसिड तपासत आयुष्यभर औषध घेतले पाहिजे. फेबुकसोस्टेट हे नव औषध आता भारतात उपलब्ध झाले आहे. ते फार महागही नाही. आणखी काही औषधे लवकरच बाजारात येतील . गाऊटसाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी वगैरे औषधांसाठी अद्याप वैज्ञानिक पुरावे नाहीत. रक्तात १० मिली ग्राम पेक्षा जास्त युरिक ऍसिड असेल तर गाउटचा संधिवात नसला तरी उपचार करावेत,असा सध्या मतप्रवाह दिसतो. मद्य, मांस, मासे व गोड शीतपेय यांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. आहाराची इतर जास्त पथ्य मात्र करू नयेत .