1) सूज असणाऱ्या आमवतांपैकी र्हेउमटोइड आमवात सर्वात महत्त्वाचा. स्त्रियांमध्ये या या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा ५ ते १० पटींनी जास्त आहे. त्यात काहीशी अनुवांशिकताही आहे. तरुण वयात आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या आजाराकडे फार गांभीर्याने पाहिले पाहिजे. या आमवाताच्या सुजेमुळे सांध्याच्या आतली कुर्चा आणि हाडे कुर्तडली जाऊन त्याचा नाश होतो. आपल्या शरीरात कूर्चेचे पुनरुज्जीवन होऊ शकत नसल्यामुळे एकदा वाकडा झालेला सांधा पुन्हा सरळ होऊ शकत नाही.
2) सांध्याला सूज येणे म्हणजे सायनोव्हियम पेशींना सूज येणे . त्यातून अधिक प्रमाणात द्रव पदार्थ निर्माण होणे आणि तो द्रव सांध्यात साठून सांध्याचा आकार मोठा होणे त्याला आयुर्वेदात आमवात म्हणतात .
3) आमवाताचा सांधा सुजेमुळे रबरासारखा होतो . दाबले तर चहूबाजूंना दुखते. सांधा जरासा गरम लागतो. आणि कधीकधी विशेषतः गोऱ्या रंगाच्या रुग्णामध्ये लालसर दिसतो . रात्रीच्या झोपेनंतर किंवा सकाळी एरवी देखील विश्रांतीनंतर सांधे कडक होणे हे याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण. विशेषतः सकाळी अर्धा एक तासापर्यंत सांधे नीट हलवता येत नाहीत .
4) ज्यांच्या रक्तात ऱ्हुमॅटॉइड फॅक्टरचा दोष असतो, त्यांचा आमवात जास्त घातक असतो. ऱ्हुमॅटॉइड फॅक्टर व्यवहारात आर. ए. फॅक्टर म्हणतात. पण हा शब्द चुकीचा आहे. नसला तरी रोग्याला ऱ्हुमॅटॉइड आमवात असू शकतो. अलीकडे एसीपीए नावाची खास पण महागडी रक्तचाचणी उपलब्ध झाली आहे.
उपचार
निदान लवकर होऊन उपचार झाले तर बहुतेकांचा आमवात हमखास नियंत्रणात येतो. ऱ्हुमॅटॉइड आमवात पूर्ण बरा करण्याचे वैज्ञानिकांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल अशी औषधे येऊ घातली आहेत . अर्थात ज्यांचे निदान पटकन झाले आणि उपचार व्यवस्थित झाले अशा रुग्णांसाठीच. सध्याच्या औषधांनी आमवात पूर्ण बारा होत नाही. तो मधुमेह , ब्लडप्रेशर सारखा कायम औषधे घेऊन नियंत्रणात ठेवावा लागतो. क्वचित काही नशीबवान लोकांची औषधे दोनेक वर्षांनी पूर्णपणे बंद होतात . मुळात २०% लोकांचा आमवात सौम्य असतो. उरलेल्या ८० टक्क्यांमध्ये आजाराचे दम्यासारखे चढ-उतर चालू राहतात. ज्यांचे उपचार लवकर सुरु होतील , त्यांचे औषध दोनेक वर्षांनी सुटण्याची शक्यता जास्त. सुरुवातीला औषधांची संख्या जास्त असते. पण हळूहळू काही महिन्यांनी आजार नियंत्रणात येतो. तशी औषधे कमी होतात. आमवातात स्टिरॉइड औषधांचा डोस अगदी कमी असतो. त्यामुळे सूज ओसरतेच , शिवाय पांढऱ्या पेशींवर नियंत्रणही होते . अमावताची सूज लवकरात लवकर कमी झाली पाहिजे . हे तत्त्व; कारणहि सूज कुर्चा आणि हाडे खराब करते आणि सांधे निकामी होतात.
पथ्य
योग्य आहार आणि व्यायाम यांशिवाय अमावताचे उपचार पूर्ण होऊ शकत नाहीत. आहार संतुलित आणि आरोग्यदायी असावा. आंबवलेले (ब्रेड, दही, इडली, ढोकळा), साठवलेले (जॅम, लोणचे ) किंवा शिळे खाऊ नये. जेवणात ताज्या भाज्या आणि फळे असावीत . वजन जास्त असल्यास नियंत्रणात आणावे . अज्ञान, जागरूकतेची अभाव, आणि तज्ज्ञांची कमतरता हे सारे संधिवाताच्या योग्य उपचारांमधले अडथळे आहेत . रुग्णांनी आजाराविषयी योग्य माहिती मिळवून जाणीवपूर्वक उपचार घेतले आणि मन खंबीर ठेवले तरच या आजारावर चांगले नियंत्रण ठेवता येऊ शकेल.